डोंबिवली : डोंबिवली-सागाव येथील जयभारत इंग्लीश शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी शिक्षेकविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याची तक्रार शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यवस्थापनाकडून कारवाईची  याची वाट न पाहता परस्पर  शिक्षिकेने गुंडाची मदत घेऊन दोन मुलांना दमबाजी करत डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची तक्रार  शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याप्रकरणाची गंभीर दखल घेतली नसल्याने शिक्षिकेच्या विरोधात शाळा व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. जोर्पयत या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही. तोर्पयत शिक्षिकेचे निलंबन कायम राहणार आहे.


इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणा:या दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या दारावर शिक्षिका रोहिणी शर्मा यांच्याविषयी अपशब्द लिहिले होते. हा प्रकार शिक्षिका शर्मा यांनी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना अय्यर यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची गंभीर दखल मुख्याध्यापिका अय्यर यांनी घेतली.


शिक्षिकेचा दोन मुलांवर संशय होता. मात्र त्याच मुलांनी हे प्रकरण केले आहे याची शहानिशा केल्याशिवाय मुलांना शिक्षा देणे योग्य नाही अशी भूमिका  मुख्याध्यापिकेने घेतली.  संशयित मुलांच्या पालकांना  शाळेत बोलावून घेऊन प्रकरण हाताळत असतानाच  मुख्याध्यापिकेकडून न्याय मिळणार नाही असा समज शिक्षिकेने केला. त्या शिक्षिकेने  चक्क गुंडांची मदत घेत स्वतःच शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने  दोन मुलांना बोलावून घेतले आणि गुंडांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्या गुंडांनी ७ तास डांबून ठेऊन नंतर बेदम मारहाण केल्याचा  आरोप पीडित मुलाने केला आहे..



घडलेला हा प्रकार येऊन पालकांनी मुख्याधिका अय्यर यांना कथित केला. हा प्रकार ऐकून अय्यर यांना धक्काच बसला. त्यावर अय्यर आणि  शाळा व्यवस्थापनातील विश्वस्त के. शिवा अय्यर शिक्षिकेला विचारणा केली. मुलांना मारहाण करणा:या व्यक्तिंचे नाव सांग. शिक्षिकेने नावे सांगितली नाही. त्यावर विश्वस्त अय्यर यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कारवाई केलेलीनाही. पोलिस कारवाई करीत नसल्याने या प्रकरणाची चौकशी होईर्पयत व्यवस्थापनाने शिक्षिकेस निलंबित केले आहे.