खंडाळा घाटात दरड कोसळली, एकाचा मृत्यू
मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटातील मंकीहील स्टेशनच्या पुढे असणा-या नागनाथ बोगदा क्रमांक ४० च्या तोंडावर दरड कोसळली.
लोणावळा : मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटातील मंकीहील स्टेशनच्या पुढे असणा-या नागनाथ बोगदा क्रमांक ४० च्या तोंडावर दरड कोसळली. यामध्ये रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक दुरुस्तीचे काम करणा-या एका रेल्वे कर्मचा-याचा जागीच मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजन असून त्यांना लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटातील मंकीहील स्टेशनच्या पुढे दुपारी २.३० च्या सुरमारास नागनाथ बोगदा क्रमांक ४० च्या पुणे बाजूकडील तोंडावर अचानक एक मोठी दरड कोसळली. याचवेळी रेल्वेच्या पी.डब्लू.ए.वाय.पनवेल डेपोचे काही कर्मचारी रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम करत होते. ही दरड रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडून ट्रकवर पडली. यामुळे वायरही तुटल्यानं मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद पडली होती. आता रेल्वेच्या मिडल लाईन या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु ठेवण्यात आलीय.