गेल्या वर्षभरात विविध बँकेमध्ये बनावट नोटांचा भरणा
मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यासह १२ जणाची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याच उघडकीस आल्यानं छबु नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्यानोटांचा यात समावेश आहे का या दृष्टीने तपास सुरु आहे..
नोटा बंदींच निर्णय लागू केल्यानंतर सर्वत्र काळा पैसा पंधरा करण्याचे उद्योग सुरु झालेत. यात रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराबरोबरच व्हाईट कॉलर म्हणून समाजात मिरविणारे हातात हात घालून फिरताना दिसत होते. याच काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या १२ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी रंगेहात अटक केली.
त्यांच्याकडून १ कोटी ३५ लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यामुळेच चलनातील या बनावट नोटा व्यवहारात आल्याचा संशय व्यक्त केला जातो. गेल्या दीड वर्षात नाशिक मध्ये बनवत नोटा चलनात आल्याचे २१ तर वर्षभरात ९ गुन्हे दाखल झाले असून हजारो रुप्याच भरणा बँकेत करण्यात आलाय.
बँकेच्या विविध शाखांमध्ये ४३ हजार ७५० बनावट नोटांचा भरणा झाल्याच गुन्हा एकट्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालाय. छबु नागरे आणि त्याच्या टोळीने छापलेल्या बनावट नोटा आणि बँकेत भरणा झालेल्या नोटांचा काही सबंध आहे का त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे.
अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५० रुपयापासून हजार रुपयापर्यंतच्या बनावट नोटा बँकेत भरणा झाल्याच निद्र्शानसा आलाय यात शंभर रुपयाच्या १७. पाचशे रुपयाच्या ३८ आणि हजार रुपयाच्या २३ नोटांचा भरणा झाल्याचा गुन्हा दाखल झालाय. असेच गुन्हे नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, ५०० आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या असल्या तरी इतर नोटा आजही चलनात असल्यान त्यांचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी पोलीस आणि नागरिकांवर आहे.