लातूर बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकाने निधन
जिल्ह्यातल्या एका बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकानं निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेतील कामाचा ताण आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
लातूर : जिल्ह्यातल्या एका बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकानं निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेतील कामाचा ताण आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानीमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अंबादास विठ्ठलराव राजापुरे, शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. नोटबंदी आणि चलन तुटवड्यामुळे अंबादास राजापुरे यांच्यावर कामाचा ताण कमालीचा वाढला होता. सकाळी लवकर बँकेत जाणे आणि रात्री उशीरा घरी येणं, यामुळे त्यांची प्रकृती ढासळली.
कामाचा ताण कमालीचा वाढल्याने त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यामधल्या आलूर इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.