पुणे : पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर पुणे आणि मुंबईमध्ये आयपीएलची मॅच होत आहे. या मॅचच्या वेळी स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये एका दिवसाचा मद्यविक्रीचा परवाना देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा परवाना देताना नामी शक्कल लढवण्यात आली आहे. गहुंजे स्टेडियम मध्ये फक्त कॉर्पोरेट बॉक्स मध्ये मद्य विक्रीस मान्यता देण्यात आलेली आहे. हे अंतर हायवे पासून दीड किलोमीटर आहे. व्यक्ती पायी ज्या रस्त्याने जाईल त्या प्रमाणे अंतर मोजण्याची तरतूद कायद्यात आहे. त्याच प्रमाणे हे अंतर मोजण्यात आले आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे मीटरच्या आत मद्य विक्री बंद करण्यात आली आहे. पुण्यातलं गहुंजे स्टेडियम हे एक्स्प्रेस हायवेला लागून आहे.