शिर्डी :  शिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही याचिका दाखल केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत.२८ जुलैला राज्य सरकारने शिर्डीच्या नव्या संचालक मंडळाची यादी जाहीर केली होती.


या विश्वस्त मंडळात सुरेश हावरे, मनीषा कायंदे, चंद्रशेखर कदम, सचिन तांबे, प्रताप भोसले, अमोल कीर्तीकर आदींचा समावेश आहे. मुंबई हायकोर्टाचे आदेश डावलून या राजकीय पुढा-यांची या विश्वस्त मंडळावर नेमणूक करण्यात आलीय.