लोणावळा : चालती गाडी पकडणं किती धोकादायक ठरू शकतं याची प्रचिती देणारे दृश्य लोणावळा स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळा रेल्वे स्टेशनवर चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात पाय घसरून ट्रेनच्या खाली जात असलेल्या व्यक्तीला रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या आर.पी.एफ.च्या सुमित पाल आणि जी.आर.पी.च्या सचिन भोई यांनी वाचवलं.  बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. 


मुंबईहून आलेली नागरकोईल एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर थांबली. 2 मिनिटाच्या थांब्यानंतर ही ट्रेन सुटली. दरम्यान स्टेशनवर आलेल्या एका व्यक्तीने ही चालू ट्रेन पळत जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला. 


गडबडीत ट्रेनचा दरवाजा पकडला..त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर त्याचा पाय सटकला. तो ट्रेनसोबत फरफटत जाऊ लागला. यात त्याचं अर्धेशरीर ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्या दरम्यानच्या गॅपमध्ये गेलं. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या सुमित पाल आणि सचिन भोई यांनी त्याला बघितला. पळत जाऊन त्या प्रवाशाला बाहेर खेचले. अपघताताचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.