नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या
शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सध्या अज्ञात चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य बनवलं आहे. शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली. तर मल्हारवाडी, चांडक कॉलनी, नांदेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि समतामार्गावरच्या हनुमान मंदिरामधल्या दानपेटीतली रोकड चोरली गेली.
गेल्या दोन आठवड्यात नाशिक शहरातल्या अनेक मंदिरांना याचा फटका बसला आहे. घरफोडी ,मोबाईल लूट तसंच वाहन चोरी यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता मंदिरातले देवही असुरक्षित झाले असल्याची भावना नाशिककर व्यक्त करत आहेत.