अलिबाग : महाड दुर्घटनेत एकूण २६ मृतदेह आतापर्यंत हाती आले  आहेत, त्यापैकी १९ जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ते  संबंधितांच्या वारसांना देण्यात येत आहेत. उर्वरित ७ जणांच्या संदर्भातही कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होईल. अशी माहिती महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी दिली.


या दुर्घटनेतील मृत स्नेहल व सुनिल बैकर, अविनाश बलेकर, यांच्या वारसांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी धनादेश देऊन त्यांचे सांत्वन केले .


अजय सिताराम गुरव यांच्या वारसांना राजापूर तहसिलदार सचिन भालेराव यांनी तर प्रशांत माने यांच्या वारसांस अंधेरीचे महसूल नायब तहसिलदार श्री.हलाले तसेच श्रीमती भूमी भूषण पाटेकर यांच्या वारसांना वैभववाडी तहसिलदार संतोष जाधव यांनी धनादेश दिले.