महाड : महाड दुर्घटनेतील पुरात वाहून गेलेल्या दोन एसटी बसेस सापडल्यात. तीन दिवसांपूर्वी 11 ऑगस्टला सावित्री नदीत वाहून गेलेली राजापूर-मुंबई ही पहिली एसटी नौदलाला सापडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघाताच्या स्थळापासून 200 मीटर अंतरावर ही बस आढळली.. या बसमध्ये कोणताही मृतदेह सापडला नव्हता. तर जयगड-मुंबई ही दुसरी एसटी शनिवारी सापडलीय. घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर ही बस सापडलीय. नौदलानं अथक प्रयत्नांनंतर या बसचे अवशेष बाहेर काढलेत. 


पाच मीटर खोलवर ही बस रुतून बसली होती. याच अपघातातील तवेरा गाडी सापडेपर्यंत शोध सुरूच राहील असं प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं . त्यामुळे रविवारी तवेरा गाडीचा शोध सुरूच राहणार आहे.