मुंबई : महाड दुर्घटनेत दोन महिन्यांत बेपत्ता नागरिक अथवा त्यांचे मृतदेह सापडले नाहीत, तर त्यांना मृत घोषित करून जाहीर झालेली मदत कुटुंबियांना देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड दुर्घटनेमध्ये किमान १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या चार दिवसांत एकही बेपत्ता नागरिक किंवा कुणाचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे नातलग अस्वस्थ आहेत. शोधकार्य अद्याप थांबलेलं नसलं तरी सावित्री नदीत मोठ्या प्रमाणावर असलेल्या मगरींचा अडथळा येत असल्याचं पाटील म्हणाले. 


बेपत्ता असलेल्यांची ४२ जणांची यादी आहे. होंडा सिटी गायब झालेली नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. २२ तारखेला पुण्यात अभियंत्यांच्या बैठकीत राज्यातल्या पुलांच्या ऑडिटबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले.