सोलापूर: मित्र पक्षांनी सरकारला चांगलाच घरचा आहेर दिला. सत्ता आमच्या जीववर आणि राष्ट्रवादीशी मैत्री, अशा शब्दात महादेव जानकर यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. सत्तेची मस्ती येऊ देऊ नका असं जानकर म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू शेट्टी, विनायक मेटे आणि महादेव जानकर यांनी साथ दिली म्हणून भाजपची सत्ता आलीय आणि येत्या काळात भाजपला धडा शिकवू असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिलाय. 


सोलापुरातल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.. मंत्रीपदासाठी भीक मागणार नसल्याचंही जानकर यांनी यावेळी सांगितलंय.. मात्र याचवेळी सब्र का फल मीठा होता है असं सांगायलाही ते विसरले नाहीत.


तर पाण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, म्हैशाळ योजना आठ दिवसांत सुरू केली नाही तर सांगली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा राजू शेट्टींनी दिला.