नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जानकरांना निवडणूक आयोगानं नोटीस दिली आहे. यानंतर आता महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


पाहा काय म्हणाले जानकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी कुठल्याही प्रस्थापित राजकीय कुटुंबातून आलेलो नाही. मी स्वत:ला झिजवत स्वकतृत्वातून वर आलेला सामान्य कार्यकर्ता आहे, जो सामान्य माणसाच्या हक्कासाठी समर्पित आहे. मला फक्त राजकीय डावपेच कळत नाही. तरीही मी निवडणुक आयोगावर कुठलाही दबाव आणलेला नाही.


उमेदवार श्री. मोटवाणी ह्यांनी मला विनंती केली की मला कॉँग्रेसकडून निवडणूक लढवायची नसून मला अपक्ष म्हणून आपल्या कपबशी हया चिन्हावर लढायचे आहे. तेव्हा मी फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती केली. माझा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास असून ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत. -महादेव जानकर