मुंबई : 'नीट'चा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आलीय. या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे उपस्थित होते.


अध्यादेश काढून सीईटी झालेल्या राज्यांना एका वर्षासाठी नीटमधून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला उपस्थित राज्यांनी सहमती दर्शवली. दिल्ली सरकारनं मात्र या निर्णयला विरोध केला. 


या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, मिझोराम या राज्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीनंतर संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकही झाली. मात्र या बैठकीतही कोणताच ठोस तोडगा निघू शकलेला नाही. 


विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सल्ला-मसलत करुनच निर्णय घेऊ असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय.