मालेगाव - मनमाड रस्त्यावर ट्रकला आग, वाहतूक ठप्प
मालेगाव - मनमाड रस्त्यावर आगपेटीच्या ट्रकला भीषण आग लागलीय. या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय.
नाशिक : मालेगाव - मनमाड रस्त्यावर आगपेटीच्या ट्रकला भीषण आग लागलीय. या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय.
आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत. आगीमुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय.
ट्रक चालक फरार झालाय. जीवित हानी झालेली नसली, तरी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.