मुरबाड : दरड हटवण्याच्या कामानिमित्तानं माळशेज घाट दोन ते तीन दिवस बंद राहणार आहे. माळशेज घाटात रविवारी दुपारच्या सुमाराला दरडी कोसळल्या. दरडी इतक्या भयंकर होत्या, की अहमदनगरहून कल्याणला निघलेला ट्रक त्या दरडी चुकवून पुढे जात असताना, ट्रक दरीमध्ये कोसळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातामध्ये ट्रक चालक शेर अल्ली जागीच ठार झाला. तर क्लिनर अनिल अडागळे गंभीर जखमी झाला आहे. दरडी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे दोन तीन दिवस हा घाट बंद असणार आहे.