पुणे : पुण्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात शुद्धोधन वानखेडे या तरुणानं थेट  कैफ नावाच्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तरूण कात्रजच्या उद्यानात शुध्दोधन फिरायला गेला होता.  त्यावेळी तेथील एका वाघाच्या डोक्यावरुन हात फिरवत होता. ते पाहून तेथील सुरक्षारक्षकानं त्याला बाजूला जाण्यास सांगितलं. त्यामुळं दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर शुद्धोधननं थेट शेजाऱ्याच्या कैफ नावाच्या पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली. त्यावेळी वाघ आणि त्याच्यामध्ये थोडेच अंतर शिल्लक होते. पण वाघाने तरूणावर हल्ला केला नाही.  


हा सर्व प्रकार लक्षात येताच तेथील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधन राखून शुद्धोधनला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 


 शुद्धोधन पिंजऱ्या बाहेर काढले तेव्हा तो बडबड करीत होता. त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


 
या आधीही वाघाच्या पिंजऱ्या मारली होती उडी...


 
 यापूर्वीही पुण्यात एका माथेफिरूने पेशवे उद्यानातील वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली होती. त्यावेळी वाघाने त्यावर हल्ला केला होता. 'सामना' दैनिकाचे छायाचित्रकार यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हे छायाचित्र टिपले होते.