अकोला : तेल्हारा शहरात माणुसकी अन माणुसपणाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. घरात उच्छाद मांडणा-या 2 माकडांना संतोष खारोडे यानं लोखंडी राँडनं ठार मारलं आहे.


संतोष खारोडेच्या हल्ल्यात दोन माकडांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 माकड आणि त्याचं पिल्लू गंभीर जखमी झालं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी संतोष खारोडे विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलंय. तो महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत आहे. तेल्हारा शहरातील आसरा माता चौकात शुक्रवारी संध्याकाळच्या सुमाराची ही घटना आहे.