विरार : विरारमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी धर्मराज यादव याला अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मराजची पत्नी अमरावती यादव विरार पूर्वेतल्या फुलपाडा इथल्या राजगोविंद अपार्टमेंटमध्ये राहत होती. पहाटे चार वाजता धर्मराजनं पत्नी अमरावतीला तिच्या घराखाली बोलवून घेतलं आणि तिथेच तिच्या डोक्यात लाकडी फळीचा घाव घालून तिची हत्या केली.