मनमाड : येथील नांदगाव रोडवरील समित प्लाझा इथे जळीतकांड घडले आहे. याच ठिकाणी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या कार्यालयाबाहेर हे जळीतकांड घडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाडच्या कांदे यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या दोन व्हॅन आणि एक दुचाकी पेटवण्यात आली आहे. यात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेचीही तोडफोड करण्यात आलीय.. पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार येताच लक्षात त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर आगीनं रौद्ररुप धारण केलं होते. या घटनेत रेल्वे सुरक्षा दलाची जेवणाची दुचाकी जळून खाक झाली.


या जळीतकांडामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहे.