कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर सरकारशी संवाद साधण्यासाठी राज्यभरातील आयोजकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये राज्यातील विविध संघटनाचे पंचवीस ते तीस प्रतिनीधिंचा समावेश असणार आहे. 


समिती गठित झाल्यानंतर सरकार तात्काळ मराठा समाजाच्या समितीशी चर्चा करुन मराठा समाजाचे प्रश्न तात्काळ सोडवावेत अशी मागणी आजच्या महागोलमेज परिषदेत करण्यात आली. जर या समितीशी चर्चा करुन मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा केला नाही तर आगामी काही दिवसात पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही या परिषदेमध्ये देण्यात आलाय. 


मराठा समाजाच्या समिती व्यतिरीक्त कोणी वैयक्तीक आंदोलन करणार असतील तर त्याला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसणार आहे, त्याचबरोबर पुण्यात निघणारा अर्धनग्न मोर्चाशी मराठा समाजाचा काही संबध नाही असा सुर सुद्धा आजच्या मराठा महागोलमेज परिषदेमध्ये उमटला.