कोल्हापूर : कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गांधी मैदानातून सुरु झालेल्या या मोर्च्यात सांगली, सातारा, बेळगाव आणि कोकणातूनही मराठा समाज मोठ्या संख्येनं आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेसुद्धा या मोर्चात सहभागी झाले. याही मोर्चामध्ये महिला आणि तरुणींची उपस्थिती लक्षवेधी होती. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.