बारामतीत आज मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन
मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आज बारामतीत करण्यात आलय.. या मोर्चात बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात होईल.
पुणे : मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आज बारामतीत करण्यात आलय.. या मोर्चात बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात होईल.
मोर्चात सर्वात पुढे शाळा कॉलेजच्या मुली नंतर महिला भगिनी त्यानंतर वकिल डॉक्टर, ज्येष्ठ आणि त्यानंतर अन्य समाज बांधव असे स्वरूप आहे. मोर्चा शिवाजी उद्यान येथून सुरु झाल्यानंतर कऱ्हा नदी पुलावरून गुनवडी चौक, इंदापुर चौक, सिनेमा रोड मार्गे भिगवण चौक तीन हत्ती चौकातून पुनावाला गार्डनसमोरून वसंतनगर मार्गे मिशन हायस्कूल मैदानावर जाईल.
याठिकाणी कोपर्डी घटनेतील अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भायाला आणि उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी २५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. या मोर्चासाठी पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.