मुंबई: केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठीचा विधिमंडळ सदस्याचा ठराव याच अधिवेशनात करण्यात येईल आणि त्यानंतर तो केंद्राकडे पाठवण्यात येईल असंही तावडे म्हणाले आहेत. 


राज्यातल्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांच्यासारख्या केंद्रीय शाळांमध्ये मराठी विद्यार्थीही शिक्षण घेतात, पण या शाळांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 4 ओळींचा असतो, अशा शाळांना आता शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणंही बंधनकारक करण्यात येणार आहे. 


या शाळांना तीन वर्षांनी राज्याच्या शिक्षण विभागातर्फे एनओसी घ्यावं लागतं. पहिली ते सातवी मराठी शिकवणं, तसंच शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणं बंधनकारक करा अशी अट एनओसीमध्ये घालण्यात येईल असं विनोद तावडेंनी सांगितलं आहे.