मुंबई : शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार याआधी शहीद सैनिकांच्या कुटुंबाना मिळणारी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत 2016-17 वर्षामध्ये आता वाढवून आठ लाख इतकी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे 2017 नंतर प्रत्येक वर्षी या रकमेमध्ये पन्नास हजारांची वाढ केली जाणार आहे. ही आर्थिक मदत शहिदाची पत्नी, आईवडिल यांना विभागून दिली जाणार आहे. तर सैनिकाला अपंगत्व आल्यास सध्या एक लाख ते 3 लाख रूपये एवढी आर्थिक मदत दिली जाते. ती आता सव्वा लाख ते 4 लाख रूपये इतकी करण्यात आली आहे. 2017 पासून दरवर्षी या आर्थिक मदतीतही पन्नास हजारांची वाढ केली जाणार आहे.