कोल्हापूर : जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये कार्वे या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  


अंत्यत शोकाकुल वातावरणात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी केली होती. राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री यूनिटचे जवान होते. 


राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, ९ आणि ५ वर्षांची दोन मुलं, आई-वडील आणि २ भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. १३ वर्षांपूर्वी राजेंद्र सैन्यात भरती झाले होते.