नागपूर : राज ठाकरे यांनी माझी काळजी करु नये, मी १०० वर्षे जगणार आहे, असे संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी राजना प्रत्युत्तर दिलेय. त्याचवेळी महाराष्ट्राचे चार भाग करा आणि बेळगावात मतदान घ्या, याचा उल्लेख केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतंत्र विदर्भाच्या मुदद्यावरून महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मा.गो. वैद्य यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी एखाद्या मारेकऱ्याकडून माझी हत्या करवून घेतली नाहीतर मी माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेल, असे वैद्य म्हणालेत.


राज यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवरील सभेत वैद्य यांनी उद्देशून ज्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे, ते स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याची भाषा करतात, असे म्हटले होते. राज यांच्या याच टीकेला  वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. 


मला आणि त्यांना एक दिवस या जगातून जायचे आहे. मात्र, माझी सध्याची प्रकृती पाहता मी आणखी सात वर्षे म्हणजे माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेन, असे वाटते. दरम्यान, मा.गो.वैद्य यांनी लहान राज्यांच्या आपल्या मागणीचा पुनरूच्चार करताना नवीन राज्य पुर्नरचना आयोगाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.