डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग, लोकांचे स्थलांतर
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अल्ट्रा टेक कंपनीत भीषण आग लागली. या आगीत काही गॅस सिलेंडरचा स्फोटही झालाय.
डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अल्ट्रा टेक कंपनीत भीषण आग लागली. या आगीत काही गॅस सिलेंडरचा स्फोटही झालाय.
या गोडाऊनच्या शेजारी गॅस सिलेंडर्सचे आणखी काही गोडाऊन्स आहेत त्यांनाही या आगीमुळे धोका निर्माण झालाय. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हावलण्यात आले आहे. दरम्यान याच गोडाऊनला वर्षभरापूर्वीही आग लागल्याची माहिती पुढे येतीये.