कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाकरमान्यांप्रमाणे लोकलनं मुंबई गाठली. कोल्हापूर-मुंबई रेल्वेनं प्रवास करणा-या  मंत्री महोदयांना रेल्वेच्या अनयिमित सेवेचा फटका बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनयिमित रेल्वेमुळे कर्जत ते मुंबईपर्यंतचा प्रवास लोकलने करावा लागला. चंद्रकांत पाटील पत्नीसह कोल्हापूरहून महाल्क्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. मात्र साताऱ्यात आल्यावर इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यानं रेल्वे तब्बल तीन तास एकाच ठिकाणी ठिकाणी खोळंबून राहिली. 


महलक्ष्मी एक्स्प्रेस कर्जतला आल्यानंतर लोकललच्या व्यस्त वेळापत्राकामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस आणखीनच रखडवण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत येण्यासठी लोकलचा पर्याय निवडला आणि ते मुंबईला पोहोचलेत.