नागपूर : विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी हा दावा केला आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त विधान मुख्यमंत्र्यांनाही रुचले नाही. त्यांनी सरकारच्या महत्वाच्या निर्णयांचा पाढा वाचला. इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सातत्याने होत असल्याने या बाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.