आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता
राज्याच्या अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावेळी गोंधळ घालणाऱ्या १९ आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. विधान परिषदेत लेखानुदान मंजूर करण्याच्या बदल्यात आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार निलंबनानंतर विरोधक संघर्ष यात्रा काढणार होते पण यातली हवा काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. १९ पैकी किती आमदारांचं निलंबन मागे घ्यायचं यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.