विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली : ऐन उन्हाळी सुट्टीत डोंबिवली येथील महापालिकेचा तरण तलाव बंद असल्याने नागरिकांचा विशेषतः लहान मुलांचा हिरमोड होत आहे..याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेतर्फे आज एक अनोख आंदोलन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरड्या पडलेल्या तलावात प्रतिकात्मक  लहान मुलांच्या  महापौर चषक पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला..गेले जवळपास  आठवडा भर दुरूस्तीच्या नावाखाली डोंबिवली क्रीडा संकुलातील तरण तलाव बंद आहे.


सध्या मुलांना सुट्ट्या लागल्या असून या अनेक पालक आपल्या मुलांना पोहण्यासाठी इथे पाठवत असतात. दरम्यान ही दुरुस्ती गरजेची असून पोहोणार्यांनी तक्रारी केल्या नंतर दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलेल आहे.


येत्या रविवार पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होऊन तरण तलाव पूर्ववत खुला होईल असं आश्वासन पालिकेच्या वतीनं देण्यात आलं आहे..तर रविवार पर्यंत हा तरण तलाव खुला न झाल्यास आयुक्त आणि महापौर यांच्या दालना मध्ये घुसून धडक आंदोलन करण्याचा इशारा मनसेन दिला आहे...