मनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध
महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे : महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रभाग क्रमांक दोन मधील मनसेचे उमेदवार राजकुमार ढाकणे यांची उमेदवारी जिल्हा कोर्टाने वैध ठरवली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शौचालय दाखला नसल्याने उमेदवारी अर्ज बाद केला होता.
दरम्यान, आपण हा दाखला दिला होता. पण निवडणूक कार्यालयाने हा दाखला गहाळ केला. हे म्हणणं कोर्टाने मान्य केले करत निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे मनसे उमेदवारीमुळे प्रभाग दोनमध्ये आता रंगत वाढली आहे.