कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला `मनसे दणका`
`बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे `जय महाराष्ट्र` हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू ` अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.
ठाणे : 'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.
त्याला प्रतिउत्तर म्हणून ठाण्यात शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसेसवर ठळक अक्षरांत 'जय महाराष्ट्र' हे शब्द लिहून त्या बस कर्नाटकला रवाना केल्या.
दरम्यान, महाराष्ट्र विरोधी कर्नााटक भूमिकेला नाशिकमध्येही विरोध करण्यात आला. कर्नाटक बँकेसमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी कर्नाटक बँकेत जय महाराष्ट्राचा फलक झळकावला.
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँकेसमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले.