नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोगिंगला आता कमालीचा वेग आलाय. आज रविवारचा मूहु्र्त साधत नाशिकमध्ये मनसेच्या आणखी एका नगरसेविका सुमन ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांसोबत इतर पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांनीही शिवसेनेचा भगवा खांद्यांवर घेतला. त्यात माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष नगरसेविका रशिदा शेख, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक त्र्यंबक गायकवाड, राष्ट्रवादीचे उपशहरप्रमुख विशाल पवार, राष्ट्रवादीचेच शहरसरचिटणीस प्रशांत रकटे आणि व्यापारी बँक, नाशिकचे संचालक श्रीराम गायकवाड यांचा समावेश आहे. 


उद्धव ठाकरे यांच्यावर नाशिकरांचा विश्वास आहे म्हणून तिथले लोक पक्षात प्रवेश करतात, असं यावेळी सेनेचे अजय चौधरींनी यावेळी म्हटलंय. कालच मनसे सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांवर नाशिकचे प्रभारी अविनाश अभ्यंकर यांनीही जोरदार टीका केली होती.