लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन
केरळात पुढील दोन तीन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.
मुंबई : केरळात पुढील दोन तीन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.
मुंबईतही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तविला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर नेमका कसा आणि किती दिवसात कोकणात आणि मुंबईत दाखल होईल हे सांगण अधिक संयुक्तिक ठरेल असेही कुलाबा वेधशाळेच्या वतीने सांगितलयं. तुर्तास महाराष्ट्रात तापमानाचा पारा हळूहळू खाली येईल. दरम्यान मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले, तसंच महाराष्ट्रात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसही पडतोय.
पावसाळा तोंडावर आल्यानं प्रशासन आणि बळीराजा आपापल्या पातळीवर सज्ज झालाय. बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय.