ठाणे : भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला. 29 वर्षीय दिपीका संघवी आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी हेतलचा मृतदेह सापडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुजलेल्या अवस्थेत हे मृतदेह सापडले. इमारतीत दुर्गंधी येऊ लागल्यानं नागरिकांनी पोलीसात तक्रार केल्यावर प्रकार समोर आला. 


दिपीका नवऱ्यासोबत रहात नव्हती. ती एका कॉलसेंटरमध्ये काम करायची.आत्महत्या की खून याचा आता पोलीस तपास करतायत.