`मुलगी` आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा
जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.
गोंदिया : जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.
प्रसुतीनंतर तिला मुलगा झाला असे सांगण्यात आले. त्या बाळाला मातेजवळ देण्यातही आले. मात्र, काही वेळातच बाळ अशक्त असल्यानं नवजात कक्षात ठेवण्यासाठी नेले. त्यानंतर मात्र आपल्या ताब्यात मुलगी दिल्याचा आरोप पुष्पा यांनी केलाय.
रुग्णालयात नुतनीकरणाचं काम सुरू असल्यानं सीसीटीव्हीही बंद आहेत त्यामुळं पोलिसांनाही तपासात अडचणी येतायत. मात्र आता या प्रकरणात डीएनए चाचणीची मदत घेण्यात येणार आहे. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेयत. चाचणीचा अवहाल आल्यानंतरच खरे काय ते पुढे येईल.