अलिबाग : येत्या 3 सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त झाला नाही तर संबधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या महामार्गाची पाहणी केली. आजवर झालेल्या कामाबाबत समाधानी नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 


यावेळी शिंदे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 सप्टेंबरचं अल्टिमेटम दिले आहे. दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करणाऱ्यांना टोलमाफी देण्याच्या मुद्यावर सोमवारच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेतला जाईल असं शिंदे यांनी सांगितले.