अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुंबई - गोवा महामार्गावर तीन ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरु आहेत.


रोहा मार्गे नागोठण्याकडे वाहतूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेणजवळ खारपाडा पूल तसेच वाकण फाटा आणि कोलाड नाका इथं पहाटेपासूनच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईहून येणारी वाहनं वाकण फाटा इथून भिसे खिंडीतून रोहा मार्गे वळवण्यात आलीये. तर कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक रोहा मार्गे नागोठण्याकडे वळवण्यात आली आहे.


का झाली वाहतूक कोंडी?


खारपाडा पुलापासून सुरु झालेली वाहनांची रांग कल्हे गावापर्यंत पोहोचलीये. सध्या शाळांना सुट्या सुरु झाल्यामुळे चाकरमाने आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळू लागलेत आहेत. मात्र महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम अतिशय मंदगतीनं सुरु असल्यानं या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे.