ठाणे :  मुंब्य्रातील कौसा भागात राहणारा २८ वर्षीय तबरेज आयसिसच्या (ISIS) वाटेवर गेल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यावरून एटीएस पथकानं तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जात असल्याची माहिती तबरेजनं त्याच्या कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्यानं आयसिसमध्ये सहभागी होत असल्याचं फोनवरुन कुटुंबीयांना सांगितलं. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर एटीएस पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय. 


मागील वर्षी कल्याणमधील अरीब माजीद, फाहद शेख, अमान तांडेल आणि सहीम टांकी हे चार तरुण आयसिसमध्ये सामील झाले होते. या चार तरुणांपैकी आरीब भारतात परतला होता तर सध्या आरीब तुरुंगात असून सहीम टांकी आणि अमान तांडेल आयसिसकडून लढताना मारले गेल्याची माहिती समोर आली होती.