पालिका निवडणूक : काँग्रेस होर्डिंग्ज लातूरमध्ये चर्चेचा विषय
पालिका निवडणूक जसजशी जवळ येते आहे. तस तसा प्रचाराला नवा रंग चढू लागला आहे. यंदाच्या प्रचारात शहरात काँग्रेसनं झळकावलेली होर्डिंग्ज हा सर्वच पक्षांसाठी टीका टिप्पणीचा प्रमुख मुद्दा बनलाय.
लातूर : पालिका निवडणूक जसजशी जवळ येते आहे. तस तसा प्रचाराला नवा रंग चढू लागला आहे. यंदाच्या प्रचारात शहरात काँग्रेसनं झळकावलेली होर्डिंग्ज हा सर्वच पक्षांसाठी टीका टिप्पणीचा प्रमुख मुद्दा बनलाय.
'होय हे काँग्रेसनेच केलंय' असा संदेश देणाऱ्या होर्डिंग्ज सध्या संपूर्ण शहरभर झळकत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे पुत्र अमित देशमुखांच्या छायाचित्रांसह काँग्रेसनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पालिका निवडणुकीच्या तोंडवर करण्यात आलाय. अर्थातच शहाराच्या सगळ्याच प्रमुख भागात लागलेल्या या होर्डिंग्जवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.
लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तर ही होर्डिंग्ज म्हणजे काँग्रेसरुपी रावणाचा अहंकार असल्याची टीका केली आहे. तर विरोधकांनी सकारात्मक प्रचार करण्याचे आवाहन काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलंय.
यंदाच्या निवडणूकीत पालिका प्रचारात होर्डिंग्ज सर्वच पक्षांनी कळीचा मुद्दा केला आहे. त्यामुळे या होर्डिंगचा नेमका कुणाला फायदा होतो याकडे आता लक्ष लागले आहे.