अहमदनगर : अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत. भांबोरीतल्या संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरावर हल्ला करत झोपड्या जाळून टाकल्या तसंच घरांची तोडफोड केली, त्यामुळे सध्या गावात तणावाचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळीच नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भांबोरा गावाला भेट दिली होती. काल भांबो-या अल्पवयीन मुलाची छेडछाड करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यापासून गावात प्रचंड तणाव आहे. 


या प्रकरणातील आरोपीला तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यातील दोन अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.