नागपूर :  परीक्षेकरता आवश्यक असलेले हॉल तिकीट जप्त केल्यानंतर ते परत देण्याकरता प्राध्यापकाने एका विद्यार्थिनींकडे अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या धरमपेठ पॉलिटेकनिक कॉलेज मधील हि घटना असून, घटना उघड झाल्यावर स्थानिक संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित प्राध्यापकाला मारहाण देखील केली. अमित गणवीर असं आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे. 


या प्राध्यापकांची तक्रार कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली पण त्यांनी कारवाई केली नाही म्हणून कायदा हातात घेतल्याचा दावा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आहे. या प्रकरणात नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन येथे दोन्हीही प्रकरणात गुन्हा दाखल होतो आहे. झालेले संभाषण पीडित मुलीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने संबंधित प्राध्यापक चांगलाच अडचणीत सापडला आहे.