सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावमधल्या जत्रेत अनोखा बाजार भरतो... कसा आहे हा बाजार पाहूयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या नांदेडच्या माळेगावमधल्या श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रेस सुरूवात झालीये... ही यात्रा सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे... या यात्रेतील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा गाढवांचा बाजार... महाराष्ट्रात जेजुरीमधल्या यात्रेनंतर दुस-या क्रमांकाचा गाढवांचा सर्वात मोठा बाजार माळेगाव यात्रेत भरतो... यंदाही माळेगावच्या यात्रेत गाढवांचा बाजार भरलाय... गाढवांच्या या बाजाराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुतांशी व्यवहार हा उधारीवर चालतो... शे पाचशे रुपये घेऊन कुठलीही लिखापढी न करता बयाना घेऊन गाढव समोरच्या व्यापा-याला दिलं जातं.... दुस-या वर्षी याच बाजारात त्या व्यापा-याकडून पैसे घेतले जातात... विश्वासावर हा कॅशलेस व्यवहार आजही सुरूय.


 



उधारीवर कॅशलेस व्यवहार होणा-या या बाजाराला यंदा नोटबंदीचा थोडाफार फटका बसलाय... थोड्याथोडक्याही नोटा खरेदीरांकडे नसल्याने यंदा विक्री खूप कमी प्रमाणात झाल्याचे गाढव व्यापा-याने सांगितले... 


माळेगाव यात्रेत पिढ्यानपिढ्यांपासून व्यापारी हा उधारीवरचा व्यवहार करताहेत... आजच्या जमान्यातही विश्वासावर व्यवहार चालतो त्याचं हे आगळवेगळं उदाहरण माळेगाव यात्रेत पाहायला मिळतं...