अमळनेर : नंदुरबार शहरातील शेकडो गुंड मागील पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात होते. एका पत्रकारालाही त्यांनी मारहाण केली होती, याची माहिती जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांना नव्हती का? असा सवाल आता विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसापूर्वी तणाव निर्माण झालेला असतानाही एसपींनी अत्यावश्यक पावलं का उचलली नाहीत, यामुळे अमळनेर नगपालिका निवडणुकीत मारहाण झाली आणि तणाव निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली.


सर्व काही समजूनही एसपी जालिंदर सुपेकर झोपेत असल्यासारखे का वागले, त्यांच्या झोपे मागे नेमका काय अर्थ आहे असा सवाल अमळनेरच्या जनतेकडून विचारला जात आहे. 


एका पोलिस अधिकाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणातही जालिंदर सुपेकर यांचं नाव आलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, किंवा एसपी सुपेकर यांची बदली केली नाही याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.