तुम लडो मे कपडे संभालता हूं! राणेंचा राज ठाकरेंवर घणाघात
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं.
पुणे : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राज ठाकरेंवर जोरदार तोंडसुख घेतलं. तुम लडो मै कपडे संभालता हूं असं म्हणून राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या तरुणांना तुरुंगात टाकण्याचा घाट घातला, असा आरोप नारायण राणेंनी केला.
राज ठाकरेंनी कायद्याचं उल्लंघन करण्यापेक्षा खेळासाठी नियम करण्याचा आग्रह राज ठाकरेंनी का धरला नाही असा सवाल राणेंनी केला. तुरुंगात गेल्यावर तरुणांची आयुष्य बर्बाद झाली, तर त्याला जबाबदार कोण असा सवालही राणेंनी विचारला.