नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून  दोन लाख रुपयाची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बसूनच शहर सरचिटणीस नाना शिलेदार इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देताना दोन लाख रुपयाची मागणी करत असल्याचा संवाद या व्हिडिओमध्ये उघड झालाय.


शिलेदार यांच्या बाजूलाच कार्यालयीन कर्मचारी अरुण शेंदुर्णीकर बसलेले आहेत. चेक कॅश असे दोन लाख भरा आणि पुढे चालू पडा अशी दमदाटीच नाना शिलेदार करतायेत.


पाहा भाजपच्या तिकीट 'विक्री'चा व्हिडिओ



दरम्यान या विषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा पर्यंत केला असता सुरवातीला त्यांनी फोन कट केला. दुसऱ्या वेळी इतरांच्या हातात मोबाईल सोपवून नाना आंघोळ करयला गेलेत, दहा मिनिटांनी फोन करतो असा निरोप द्यायला सांगितले आणि तेव्हा पासून त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार पारदर्शक कारभाराचा आग्रह धरला जात आहे. असं असताना भाजप पदाधिकाऱ्याकडूनच जर अशाप्रकारे उमेदवारांकडून तिकीटासाठी पैशांची मागणी होत असेल तर भाजप पदाधिकारी मुख्यमंत्र्यांचही ऐकत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.