नायलॉनचा मांजा वापरणाऱ्या मुलाच्या पालकांवर कारवाई होणार
जर तुम्ही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग करत असाल, तर पतंगाला ढील देण्याआधी सावध व्हा.
नाशिक : जर तुम्ही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग करत असाल, तर पतंगाला ढील देण्याआधी सावध व्हा. अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. वारंवार आवाहन करूनही नायलॉन मांज्याचा उपयोग होत असल्याने, नाशिक पोलिसांनी विक्रेत्यांबरोबरच पतंग उडविणाऱ्यावरही कारवाईचा इशारा दिला आहे.
डिसेंबर जानेवारी महिना आला कि दरवर्षी नायलॉन मांजाचा विषय चर्चेत येतो गेल्या चार पाकः वर्षापासून नायलॉन मांजा विरोधात मोहीम राबविण्यात येतेय मात्र त्याचा काही उपयोग होत नाही.
प्रशासनाकडून देखील दिखाव्या पुरतीच कारवाई होत असल्याने पक्षी आणि दुचाकी स्वरांचे जखमी होण्याच प्रमाण वाढत चाललाय गेल्या आठ दहा दिवसात नाशिक शहरात चार ते पाच जण नायलॉन मांजामुळे जखमी झालेत कुणाची मान कापली गेलीय तर कुणाला चेहऱ्यावर इजा झालीय. पक्षांचे तर जीवच जातायेत. एवढ्या घटना घडत असताना पोलीस करतायेत काय.
नायलॉन मांजाला बंदी असून देखील शहरात मांजा कसा दाखल होतो. बंदी असलेला मांजा विर्की करण्याची हिम्मत विक्रेत्यांची कशी होते असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने नाशिक पोलिसांनी आता थेट नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इषार दिलाय. जर मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार आहे.