महापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास
एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रस्त्यांवरील खड्डे ही नाशिकची मोठी समस्या- 91%
एकवेळ मुबलक पाणीपुरवठा व्हावा- 63%
वाहतूक व्यवस्था सक्षम नाही- 58%
मोकाट जनावरांचा उपद्रव- 64%
झोपडपट्टी वाढतेय- 69%
वैद्यकीय सुविधा चांगली नाही- 65%
नाशिककरांनी नोंदवलेली ही मतांची टक्केवारी पाहीली की नाशिक मनपाविषयी लोक काय विचार करतात ते लक्षात येईल. नाशिकच्या पत्रकारितेच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी दोन महिने केलेल्या सर्वेक्षणात ही मतं व्यक्त झाली आहेत. गंभीर बाब म्हणजे यावर्षी शंभर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस होऊन दोन महिन्यातच अपुऱ्या पाणीपुरवठ्याची तक्रार नागरिक करत आहेत. महापालिकेचं पाणी वाया जात असल्याचं मत 47 टक्के नागरिकांचं आहे. मात्र पाणी वाया जाण्यास महापालिकेइतकेच नाशिककरही जबाबदार असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.
मनपाचं मोबाईल ऍप असलं तरी ऍप वापरणाऱ्यांचं प्रमाण मात्र तुलनेत कमी आहे. 76 टक्के नागरिक ऍप वापरत नसतील तर डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी वगैरे गोष्टी प्रत्यक्षात येणार कशा
काय आहेत नाशिककरांच्या अपेक्षा?
रस्त्यावरील खड्डे बुजवा
अतिक्रमणं काढा
डास निर्मुलन करा
सीसीटीव्हींची संख्या वाढवा
पथदिपांची देखभाल करा, प्रकाश क्षमता वाढवा
वीजतारा भूमीगत करा
मनपाने जनसंपर्क वाढवावा
गटारव्यवस्थेत सुधारणा करावी
नियमीत स्वच्छता असावी
उघड्यावरील मांस विक्री बंद करावी